अमरावतीत एका दिवसात कोरोनाचे ८०२ नवे रुग्ण

0

अमरावती : जिल्ह्यात बुधवारी ८०२ अहवाल पॉझिटिव्ह आले असून १० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३१,९२५ झाली आहे.

पश्चिम वऱ्हाडात काेराेनाचा कहर वाढला असून, बुधवारी प्राप्त अहवालात अकाेला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील एकूण १०७१ जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. सर्वाधिक रुग्ण अकाेल्यात ३८५ तर बुलडाण्यात ३६८ आणि वाशिमला ३१८ रुग्ण आढळले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू झाला, अकाेला जिल्हात दाेन जणांचा तर वाशिम जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे. अकाेला जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १४,८०३ वर पोहोचली आहे. बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले असून, रुग्ण दुपटीचा वेग ३३ दिवसांवर आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भाची सीमा असलेल्या येलदरी येथील धरण परिसरामध्ये प्रशासनाने नाकाबंदी चौकी उभारली खरी, परंतु याठिकाणी कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने अनेक प्रवासी विनातपासणी मराठवाड्यात दाखल होत आहेत.विदर्भात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी विदर्भातून येणाऱ्या खासगी व सार्वजनिक बससेवा बंद करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर येलदरी धरण परिसरात मंगळवारी रात्री तपासणीसाठी चौकी स्थापन करण्यात आली. जिंतूर आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाच्यावतीने या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या मार्गाने मराठवाड्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करण्याचे नियोजन आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.