वाशिम मध्ये एकाच शाळेत 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

0

वाशिम : जिल्ह्यातील एका आदिवासी निवासी शाळेमधील 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

वाशिम जिल्ह्यातील देगाव परिसरात एक आदिवासी निवासी शाळा आहे. या शाळेतील 327 पैकी एकूण 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विद्यार्थ्यांसह चार कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना झालेले बहुतांश विद्यार्थ्यांचे वय हे 13 ते 15 इतके आहे.

तसेच बहुतांश विद्यार्थी हे अमरावती जिल्ह्यातील धारणी,अचलपूर आणि मेळघाट पट्टयातील भागातील आहेत. हे सर्व विद्यार्थी 14 फेब्रुवारीला शाळेत दाखल होते. या सर्व विद्यार्थ्यांची RTPCR चाचणी करण्यात आली होती. या चाचणीनंतर कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान निवासी शाळेमुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरला आहे.

कोरोनाबाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना थोडीशी सर्दी होती. उर्वरित विद्यार्थ्यांना कोणतेही लक्षणे अथवा त्रास जाणवत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी 24 तास आरोग्य पथके तैनात करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.