‘त्या’ इमारतीच्या ‘गॅलरी’ची पाहणी केली भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी

0

पुणे : टिक टॉक गर्ल पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन माहिती घेतली. मात्र यावेळी त्यांना समाधानकारक माहिती मिळाली नाही.

वानवडी पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव आहे. तसेच वनवडीचे वरिष्ठ निरीक्षकांची तत्काळ बदली करण्यात यावी. तसेच हा तपास पुणे पोलिसांकडून काढून तो एखाद्या आयपीएस अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

पूजा चव्हाण राहत होती तो फ्लॅट सील आहे. वरचे चार फ्लॅट आहेत ते बंद आहेत. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली आहे. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले गेले ? हे प्रश्न कायम आहेत.

पूजा चव्हाणचा मृत्यू झाला त्या ठिकाणाची माहिती घेतली. भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी मदत केली. राठोडांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता मी अकरा वाजता सगळं बोलणार आहे, असं वाघ म्हणाल्या. चित्रा वाघ यांनी इमारतीची पाहणी करण्यापूर्वी पूजा चव्हाणच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. चित्रा वाघ  1 वाजता पुणे पोलीस आयुक्तांची देखील भेट घेणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.