भाजप आमदाराच्या मुलाला मारण्याची धमकी

0

अकोला : 5 कोटी रुपये न दिल्यास मुलाला जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र अकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना आल्याने खळबळ उडाली आहे.

बिहारी नामक व्यक्तीने हिंदीमध्ये त्यांच्या दर्यापूर येथील निवासस्थानी पत्र पाठवून पाच कोटी रुपये 28 फेब्रुवारीपर्यंत देण्यात यावी, अशी धमकी दिली.

या पत्रानंतर दर्यापूर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे. तसेच, तक्रारीत कुटुंबाला सुरक्षा देण्याची मागण करण्यात आली आहे. भारसाकळे हे गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तर त्यांच्या पत्नी दर्यापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत व मुलगा जिनिंग प्रेसिंगचा संचालक आहे.

या प्रकरणावर एका वृत्तपत्राशी बोलताना भारसाकळे म्हणाले की, राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच धमकीचे पत्र आले असून, तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवावा व कारवाई करावी

Leave A Reply

Your email address will not be published.