सहाय्यक पोलिस निरीक्षकासह 3 पोलिस तडकाफडकी निलंबित, पोलिस अधीक्षकांची थेट ‘अ‍ॅक्शन’

0
सोलापूर : वाळूची गाडी सोडून देणा-या तसेच वाढदिवसानिमित्त मैदानात डीजे लावून नाच करणा-या 3 पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, पोलीस नाईक विनोद साठे, सहायक फौजदार पितांबर मारुती शिंदे असे निलंबित केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांची नावे आहेत. निलंबित केलेले पोलीस वेळापूर आणि मोहोळ तालुक्यातील आहेत.

याबाबतची माहिती अशी की, माळशिरसमधील सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव व विनोद साठे यांनी वाढदिवसानिमित्त मैदानात डीजे लावून नाच केला होता. जमावबंदीचा आदेश मोडल्या प्रकरणी जाधव आणि साठे यांच्यावर गुन्हा दाखल करत दोघांनाही निलंबित केले आहे. तर दुस-या घटनेत आष्टे (ता. मोहोळ) येथे वाळू उपसा करणा-या 12 जणांवर गुन्हा दाखल करून मुद्देमाल हस्तगत केला होता. या गुन्ह्यातील आरोपी ताब्यात असतानाही सोडून दिल्याची घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांननी सहायक फौजदार पिंताबर शिंदे यांना निलंबित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.