पिंपरी : शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील 894 आणि महापालिका हद्दीबाहेरील 6 अशा 900 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. तर पाच जणांचा आज मृत्यू झाला आहे.
वाकड येथील 59 वर्षीय पुरुष, निगडीतील 67 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 73 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 54 वर्षीय पुरुष आणि वाल्हेकरवाडीतील 44 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 552 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 15 हजार 648 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 6 हजार 481 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1885 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 790 अशा 2675 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या 1633 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1296 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 72 हजार 835 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 4601 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.