API सचिन वाझे प्रकरणाच्या तपासासाठी मोदी मुंबईत दाखल

0

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणात मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. यासाठी दिल्लीहून एनआयएचे महासंचालक योगेश चंदर मोदी मुंबईत दाखल झाले आहेत.

अंबानींना घाबरवून निवडणुकीसाठी निधी गोळा करताय का?; भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोलएनआयएच्या महासंचालकांकडून मुंबई पोलिस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सध्या एनआयएच्या अटकेत असलेले सचिन वाझे चौकशीत सहकार्य करत नसल्याचं समजतं. याशिवाय वाझेंच्या वरिष्ठांच्या भूमिकेबद्दलही एनआयएला संशय आहे. त्यामुळेच एनआयएचे महासंचालक मुंबईत आले आहेत. योगेश मोदींनी या प्रकरणात व्यक्तीश: लक्ष घातलं आहे. एनआयएचे डीजीच चौकशी करण्यासाठी आल्यानं मुंबई पोलीस दलातले अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.’ती’ स्कॉर्पिओ चोरीला गेलीच नव्हती!

सीआययू युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझेंना २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. एनआयएचे पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी असलेले विक्रम खलाटे सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलीस दलात अनेक वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी आहेत. त्यांची चौकशी योगेश मोदींकडून केली जाईल. यातून महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. त्यातून प्रकरणाची दिशा निश्चित होऊ शकेल.

Leave A Reply

Your email address will not be published.