आनेवाडी टोल नाक्यावर कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्यात ‘राडा’

0

सातारा : डब्बल टोल देण्यावरून आनेवाडी नाक्‍यावर कर्मचारी व लिंब गावातील काही तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात आठ ते दहा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत भुईंज पोलिस ठाण्यात विनायक तनपुरे, सीमा तनपुरे (दोघे रा. भोर), शुभम सावंत, सनी सावंत, नीलेश सावंत, टोल कर्मचारी आकाश रोकडे (रा. मर्ढे), रोहित सोनावणे (रा. विरमाडे) यांच्यासह अन्य पाच ते सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सूरज नारायण पवार (रा. अमृतवाडी, ता. वाई) यांनी दिली आहे.

याबाबत माहिती अशी, की कारचालक विनायक नामदेव तनपुरे व त्यांची पत्नी सीमा (रा. भोर, जि. पुणे) हे रविवारी रात्री 10 वाजता टोल नाक्‍यावरून भोरकडे जाताना विरमाडे बाजूकडील टोल लेनवर कर्मचारी व वाहनचालक यांच्यामध्ये डबल टोलवरून शाब्दिक चकमक झाली.

या वेळी येथील कर्मचाऱ्यांनी ती लेन बंद करून बॅरिकेट लावून पैसे दिल्यानंतरच गाडी सोडू, असे सांगितले. यानंतर या दांपत्याच्या काही नातेवाईकांनी टोलनाक्‍यावर येऊन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण केली. या वेळी टोल कर्मचाऱ्यांसोबत जोरदार धुमचक्री झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.