महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, पोलीस उपनिरीक्षकावर पतीचा आरोप

विष प्राशन करून आत्महत्या...

0
सोलापूर : शहर पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबल अमृता रमेश पांगरे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर गावातील बस स्थानकावर अमृता हीचा मृतदेह आढळून आल्यानंतर सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.अमृता हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल रुगणालयात पाठवण्यात आला आहे.

पती धनंजय दाढे यांनी एका पोलीस उपनिरीक्षकावर आरोप केले आहेत. आपल्या पत्नीला त्या पोलीस उपनिरीक्षकाने गोड बोलून प्रेमात अडकवले होतं. यातूनच तिने आत्महया केल्याचा आरोपी पती धनंजय दाढे यांनी केला आहे. दाढे यांनी पोलीस उपनिरीक्षावर आरोप लावले असले तरी अद्याप याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यानी कोणती माहिती दिली नाही.

अमृता रमेश पांगरे ही जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे मागील चार वर्षांपासून वाचक शाखेत कार्यरत होती. तिच्या मागे एक मुलगा पती असा परिवार आहे. पती हे खाजगी विमा कम्पनी मध्ये नोकरीस आहे. उत्तरीय तपासणीसाठी अमृता हीचा मृतदेह आणताच सोलापूर सिव्हिल रुग्णालय मध्ये त्यांच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. अमृता पांगरे यांच्या आत्महत्येने पोलिस दलात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलीस अधिकार्‍यांनी याबाबत नकार दिला आहे.

या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधीक्षक लक्ष घालून कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.