WhatsApp च्या नवीन फीचर ट्रॅकिंग साइट वाबेटाइन्फो माहितीनुसार, मेसेजिंग अॅप व्हॉईस मेसेजची सध्या चाचणी घेतली जात आहे. आता तुमच्यासाठी 3 नवीन व्हॉईस संदेश प्लेबॅक स्पीड तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे तुम्हाला व्हॉइस नोट्सवर नियंत्रण ठेवता येणार आहे. येत्या काही दिवसात वापरकर्त्यांना नवीन डिव्हाइस नियंत्रण पॅनेल मिळणार असल्याचा दावा देखील या साइटने केला आहे. डेस्कटॉपमध्ये व्हॉट्सअॅप वापरताना आता तुम्हाला पुन्हा लॉगिन करावे लागणार नाही.
एकदा लॉग इन झाल्यानंतर आपल्याला डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप, तसेच कॉल करण्याची सुविधा मिळणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आता डेस्कटॉपवरूनच ग्रुप कॉल देखील करता येणार आहे. व्हॉट्सअॅप तुम्हाला आता मेसेजिंगसह लहान व्हिडिओही दाखवेल. रिपोर्ट्सनुसार व्हॉट्सअॅप लवकरच अॅपमध्ये इन्स्टाग्राम रील्स देखील बाजारात आणण्याची योजना आखत असून वापरकर्त्यांना हे वैशिष्ट्य मोबाईलमध्ये लवकरच दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपवर 24 तासात हा मेसेज अदृश्य होईल. म्हणजेच आपल्याला पुन्हा पुन्हा चॅटकडे जाऊन मेसेज डिलीट करण्याची गरज लागणार नाही.