मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून गेल्या 24 तासात 39 हजार 544 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या 24 तासात राज्यात 23 हजार 600 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 24 लाख 027 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.34 टक्के झाले आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत आहे. देशात राज्यामध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 3 लाख 56 हजार 243 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
राज्यात आज 39544 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 23600 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2400727 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 356243 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.34% झाले आहे.
#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 31, 2021
कोरोना चाचणीच्या दरात बदल
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना चाचण्याचे सुधारीत दर जाहिर केले आहेत. त्यानुसार राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करणाऱ्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा बदलण्यात आले आहेत.
आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहेत. याशिवाय रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले आहेत. अँटीजेन टेस्ट 150 रुपयांत करण्यात येणार आहेत. या संदर्भात आरोग्य विभागने शासन निर्णय देखील जारी केला आहे.
राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 31, 2021