राज्यात मिनी ‘लॉक डाऊन’; शुक्रवारी रात्री आठ ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉक डाऊन
रोज रात्री आठ ते सकाळी 7 प्रयत्न नाईट कर्फ्यु
राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं.
आज मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांशी चर्चा केली आहे. राज्यात मॉल, रेस्टॉरंट, हॉटेल, मैदाने, हॉटेल पूर्णपणे 30 एप्रिल प्रयत्न बंद राहणार आहेत. मात्र हॉटेल मधून पार्सल सुविधा उपलब्ध असणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50 टक्के सुरु राहणार आहे.