शशिकला यांचं पूर्ण नाव शशिकला जावळकर असं होतं. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९३२ रोजी सोलापुरात झाला होता. ७० व्या दशकात त्यांनी मुख्य अभिनेत्री आणि खलनायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या होत्या.त्यांनी तब्बल १०० चित्रपटांमध्ये काम केलं.
एकापेक्षा एक नावाजलेल्या व श्रेष्ठ निर्मात्यांकडे त्यांनी काम केलं यात ‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ (२००३) इत्यादी. शशिकलाने २००५ पर्यंत चित्रपटांत कामे केलीत.
२००७ साली भारत सरकारने शशिकला यांच्या सिनेमातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ किताबाने गौरविलं, तसंच २००९ साली व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डही त्यांना प्रदान करण्यात आला होता.