नाशिक : एका उद्योजकाने कारमध्येच रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सटाणा शहराजवळ यशवंतनगर येथे बुधवारी (दि. 7) ही घटना घडली.
नंदलाल गणपत शिंदे (55, रा. सामोडे, ता. साक्री, जि. धुळे, सध्या रा. सिडको, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या उद्योजकाचे नाव असून ते कामटवाडा, नाशिक येथील मनसेचे नेते व महिंद्रा अँड महिंद्रामधील युनियनचे माजी पदाधिकारी असल्याचे समजते.