नवी दिल्ली : रोमांचक ठरलेल्या चौथ्या कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडवर 157 धावांनी विजय मिळवला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. पाचव्या दिवसअखेर इंग्लंडला 291 धावांची गरज होती. पण, भारतीय गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीपुढे इंग्लंड खेळाडूंनी लोटांगण घातले.
भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक तीन तर, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि शार्दूल ठाकुर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये रॉरी बर्न्स आणि हमीद यांनी प्रत्येकी 50, 63 धावा केल्या. त्यानंतर कोणीही मोठी धावसंख्या उभारू शकले नाही. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत 35 वर्षांनंतर लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
India go 2-1 up in the Test series 🎉#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFj1Srx pic.twitter.com/IvwZE1THXB
— ICC (@ICC) September 6, 2021
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव – 191
इंग्लंड पहिला डाव – 290
भारत दुसरा डाव – 466
इंग्लंड दुसरा डाव – 210