पोलीस अधिकाऱ्यासह भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल

0

पुणे : पतीने इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवले तर दिराने घरात कोणी नसताना जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचीतक्रार दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या पतीसह त्याच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडापोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 32 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

त्यानुसार या महिलेचा पती, दिर, सासू यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेचा पती वाशिम येथेसहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. 2015 पासून आज पर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीतम्हटले आहे. याप्रकरणी भादवी 498 377 376 323 504 506 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीच्या पतीने त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवले. त्याला विरोध केलाअसता मारहाण केली. तर घरात कोणी नसताना या महिलेच्या दिराने फिर्यादी सोबत दोन वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तरइतर आरोपींनी बाहेरून पैसे घेऊन यावे यासाठी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हादाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.