नवी दिल्ली : झारखंडचे राज्यपाल आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातील माजी केंद्रीय मंत्री रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनवण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रायपूर महानगरपालिका, मध्य प्रदेश विधानसभा आणि नंतर लोकसभेत प्रतिनिधित्त्व केलेले रमेश बैस सध्या झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत होते.
रमेश बैस यांनी छत्तीसगडमधील रायपूरचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. सामाजिक जीवनाला सुरुवात करून राजकारणात आल्यानंतर रमेश बैस 1978 मध्ये रायपूर महानगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आले होते.
लोकसभा निवडणुकीत रमेश बैस चार वेळा नशीब आजमावले असून, त्यात ते तीनदा विजयी झाले आहेत. यानंतर त्यांना 2019 मध्ये त्रिपुराचे राज्यपाल बनवण्यात आले. 2021 मध्ये त्यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्या नंतर आता ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभळणार आहेत.
रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 रोजी झाला. 1978 मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले.
1980 ते 1984 या काळात रमेश बैस हे अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य राहिले आहेत.
1982 ते 1988 या काळात रमेश बैस यांनी मध्य प्रदेशचे राज्यमंत्री म्हणूनही काम केले.
1989 मध्ये रमेश बैस पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले, जिथे रमेश बैस यांनी विजय मिळवला आणि संसदेत आपले स्थान निर्माण केले.
छत्तीसगड-मध्य प्रदेशच्या विभाजनानंतर रमेश बैस हे रायपूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले.
मार्च 1998-ऑक्टोबर 1999 पोलाद आणि खाण राज्यमंत्री
ऑक्टोबर 1999-सप्टेंबर 2000 रासायनिक खते राज्यमंत्री
सप्टेंबर 2000-जानेवारी 2003 माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
जानेवारी 2003-जानेवारी 2004 खाण मंत्रालय
जानेवारी 2004-मे 2004 पर्यावरण आणि वन मंत्रालय