शेवगावातील साखर कारखानाच्या इथेनॉल प्रकल्पात मोठी आग

0

 

अहमदनगर : अहमदनगरच्या शेवगाव येथील एका कारखान्यात स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली. स्फोट झाला त्यावेळी जवळपास 150 मजूर काम करत होते. आग लागताच सगळे पळापळ करून बाहेर आले. यातील 2 जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बाबळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता अचानक आग लागली. या आगीत इथेनॉल प्रकल्पातील सहा टाक्या फुटल्या असून अजून तीन टाक्या बाकी आहेत. पाच तासानंतरही ही आग भडकतच असून, आगीला नियंत्रण करण्यासाठी 15 अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत.

दरम्यान या दुर्घटनेत 2 जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शेवगाव येथील पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आगीच्या घटनेनंतर कारखान्याचे अध्यक्ष रणजीत पद्माकर मुळे यांनी आगी बाबत कुठल्याही अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सव्वा सहा वाजता लागलेली आग रात्री दहा वाजेपर्यंत ही कायम होती. या आगीत कोट्यावधीचे नुकसान झाले असून आगी नंतर पळापळ झाल्याने काही जण जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.