करोना विषाणुच्या नव्या प्रकाराचा कहर
नेटकऱ्यांनी घेतला धसका ः ब्रिटनमधून येणारी विमाने रद्द करण्याची मागणी
नवी दिल्ली ः ब्रिटनमधेय करोना विषाणुचा नवा प्रकार सापडल्याचा आणि तिथे लाॅकडाऊन घोषीत केल्याचा बातम्या वेगाने व्हायरल झाल्यामुळे जगभरातील अनेक देशांनी त्याचा धसका घेतला आहे. परिणामी, ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या फ्लाईट्स रद्द करण्यात याव्यात जेणे करून भारतात करोना विषाणुच्या या नव्या प्रकाराला प्रसार होण्यापासून रोखू शकू, यावर बाॅलिवूड अभिनेता विपिन शर्माने आपले मत मांडले तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ब्रिटनमधून येणारी फ्लाईट्स रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
विपिन शर्मा ट्विट करून म्हणाला आहे की, “लंडन आणि युकेमध्ये जे काही होत आहे. त्या पाहून भारतात येणाऱ्या फ्लाईट्स त्वरीत बंद कराव्यात किंवा तेथून येणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळे आणि कठोर नियम तयार करणे गरजेचे आहे”, असे मत विपिन शर्माने मांडले आहे. करोना विषाणुच्या या नव्या प्रकारचा वाढता प्रभाव पाहून नेटकऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
करोना विषाणू या खरतनाक प्रकाराने ब्रिटनमध्ये कहर माजविला आहे. वाढता धोका पाहून जर्मन सरकारने ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातलेली आहे. जर्मनीच्या आरोग्य मंत्र्यांनी सूत्रांनी माहिती दिली आहे की, करोना विषाणुच्या या नव्या आणि खतरनाक प्रकारचा वाढता प्रसार पाहून बेल्जियम आणि नेदरलॅण्ड या देशांनी पहिल्यांदाच ब्रिटनमधून येणारी विमाने आणि रेल्वे बंद केलेली आहेत.