ब्राझिलमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन आढळला

0

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे दोन नवीन स्ट्रेन ब्राझिलमध्ये समोर आले आहेत. ब्राझिलमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनच्या २ वेरिएंटनं ब्रिटनमध्ये ६ लोक आजारी पडले आहेत. तीन इंग्लँड आणि तीन स्कॉटलँडमध्ये सापडले आहेत. त्यामुळे आता ब्रिटन सरकार आणि प्रशासनाकडून अशा लोकांचा शोध घेतला जात आहे जे या सहा लोकांच्या संपर्कात आले होते.

ब्राझिलमधील कोरोना व्हायरस ब्रिटनमध्ये पोहोचल्याचे दिसून आले आहे. या वेरिएंटचे नाव P1 आणि P2 असून कोरोना व्हायरसचा सगळ्यात पहिला स्ट्रेन जपानमध्ये दिसून आला होता.

मागच्यावर्षी एप्रिलमध्ये कोरोनाची मोठी लहर पाहायला मिळाली होती. या परिसरात ऑक्टोबरमध्ये ७६ टक्के लोकांमध्ये एंटीबॉडी दिसून आल्या.

चकीत करणारी गोष्ट अशी की, यावर्षी कोरोनाच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. बरे झालेले लोक पुन्हा एकदा संक्रमित होऊ लागले आहेत. तपासणीदरम्यान दिसून आलं की, जपानमधून आलेला p1 कोरोनाचा स्ट्रेन ब्राझिलमध्ये जाऊन p2 झाला आहे. यामुळे व्हायरसचा प्रसार वेगानं होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.