ग्रामपंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाने खाते उघडले

0

पुणे : राज्यातील ग्रामपंचायत कोणाकडे यावर सर्वच पक्ष आपली टिमकी वाजवत आहेत. मात्र महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिल्लीच्या आम आदमी पक्षाने खाते उघडले आहे. लातूर जिल्ह्यातील दांपक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत.

लातूरच्या दांपक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढताना आम आदमी पक्षाने सातपैकी पाच जागांवर विजय मिळवत सत्तास्थापन केली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट रिट्विट करत थेट मराठीत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा”.

Leave A Reply

Your email address will not be published.