मुंबई : मुख्यमंत्री बदलाचा दावा करणे, त्यावर चर्चा करणे व्यर्थ आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार भावनेच्या भरात बोलले, अशी सारवासारव शुक्रवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. मुख्यमंत्री बदलाचा दावा करणे, त्यावर चर्चा करणे व्यर्थ आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार भावनेच्या भरात बोलले, अशी सारवासारव शुक्रवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. मुख्यमंत्री बदलाचा दावा करणे, त्यावर चर्चा करणे व्यर्थ आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार भावनेच्या भरात बोलले, अशी सारवासारव शुक्रवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखे-पाटील काल अहमदनगरमध्ये होते. यावेळी अब्दुस सत्तार यांनी राधाकृष्ण विखे-पाटील मुख्यमंत्रीपदाच्याही पुढे जावे, असे वक्तव्य केल्याने एकच चर्चा सुरू झाली होती.
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, अब्दुल सत्तार माझे जवळचे मित्र आहेत. मात्र, ते भावनेच्या भरात बोलून गेले. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम करत आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाची चर्चा, त्या पदावरच्या दाव्याची चर्चा व्यर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र अब्दुल सत्तारांचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, सत्तारांना हनुमानाचे नाव घ्यायचा अधिकार नाही. त्यांच्या छातीत खूपजण निघतील. त्यांच्या पोटातले ओठावर आले. त्यांच्या पोटात जे शिजत होते, तेच त्यांनी बोलून दाखवले. कुंकू एकाचे लावायचे. लग्न दुसऱ्याबरोबर आणि राहायचे तिसऱ्याबरोबर अशी सत्तारांची अवस्था असल्याचा टोला त्यांनी हाणला.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार का म्हणाले होते की, कदाचित मी एखादा हनुमान महाराजांसारखा त्यांचा एखादा भक्त असतो, तर छाती चिरून दाखवले असते की, माझ्या ह्रदयात राधाकृष्ण विखे-पाटील आहेत. आज एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना महसूल मंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. महसूलमध्येअत्याधुनिक बदल होऊ लागल्याचेही त्यांनी सांगितले.