चार वर्षापासून फरार आरोपीला भाजपकडून पद

0

औरंगाबाद: गंभीर गुन्ह्यात चार वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास भाजपकडून पद देण्यात आल्याचे समोर आले आहे.

दीपक फांदाडे असे नाव असून याला भाजपच्या पैठण युवा मोर्च्याच्या तालुका अध्यक्षपदी निवडण्यात आले आहे. दीपक फांदाडे यांच्यावर बिडकीन पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका खासगी कंपनीत जाऊन आंदोलनाच्या नावाने तोडफोड करणे, पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणी 2018 मध्ये बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. मात्र राजकीय दबावामुळे त्यंना अटक होत नसल्याची चर्चा होती. त्यामुळे सदर आरोपी सापडत नसून, फरार असल्याचा रिपोर्ट पोलिसांनी न्यायालयात सादर केला होता. मात्र पोलिसांना न सापडणारा हा आरोपी भाजपला सापडला असून, त्याला महत्वाचं पदसुद्धा देण्यात आलं असल्याने आता चर्चेचा विषय बनला आहे.

नुकतेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीच्या इतर दोन ज्येष्ठ मंत्र्यांचा गंभीर गुन्ह्यातील आरोपींसोबतचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. यावरून भाजपकडून जोरदार टीकासुद्धा करण्यात आली होती. मात्र आता खुद्द भाजपाकडूनच गुन्हेगाराला पदे दिले गेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.