कर्नाटक वरुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या गुटख्याच्या ट्रकवर कारवाई

84 लाखांच्या गुटख्यासह 1 कोटींचा माल जप्त

0

 

सातारा : गुटखा भरून कर्नाटकहून पुण्याकडे निघालेल्या कंटेनरवर कारवाई करत तळबीड पोलिसांनी 84 लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर, असा एकूण 1 कोटी 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. टोलनाका चुकवून कंटेनर पर्यायी मार्गाने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कराड-मसूर रस्त्यावर सह्याद्री कारखाना परिसरात नाकाबंदी करून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी महम्मद ताजुद्दीन सैफुनसाब बालवाले (गुलबर्गा) आणि मेहबूब बाबुमिया (बिदर, कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

गुटखा भरलेला कंटेनर कर्नाटकहून पुण्याकडे निघाला असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. टोलनाका चुकवून पर्यायी मार्गाने कंटेनर जाणार असल्याने तळबीड पोलिसांनी कराड-मसूर रस्त्यावर यशवतनगर गावच्या हद्दीत सह्याद्री कारखाना परिसरात नाकाबंदी केली. पहाटे एक कंटेनर येताच पोलिसांनी कंटेनर थांबवून चालक व क्लिनरकडे चौकशी केली. दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरमध्ये गुटखा आढळून आला.

कंटेनरसह चालक, क्लिनरला ताब्यात घेऊन कंटेनर तळबीड पोलीस ठाण्यात आणला. कंटेनरमधील गुटख्याची तपासणी केली असता सुमारे 84 लाखांचा गुटखा आढळून आला. गुटखा आणि कंटेनर पोलिसांनी जप्त करून दोघांना ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

गुटख्याची वाहतूक व विक्री होत आहे. कर्नाटकमधून गुटख्याचा मोठा साठा पुण्याकडे नेला जात असल्याची जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरुटे यांना मिळाली. तसेच महामार्गावरील टोलनाका चुकवून पर्यायी मार्गाने वाहन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी सह्याद्री कारखान्याजवळ नाकाबंदी केली. या सापळव्यात गुटखा वाहतूक करणारा कंटेनर अडकला.

Leave A Reply

Your email address will not be published.