मुंबई : राज्यामध्ये सध्या व्यभिचार सुरू आहे, तशीच वेळ आली तर मी घरी बसेल मात्र, तडजोड करणार नाही. अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मांडलेल्या हे मत महत्त्वाचे मानले जात आहे. येत्या पंधरा दिवसात मी विविध ठिकाणी मिळावे घेणार असून त्यात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे देखील राज ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना पक्ष सांगेल ते काम करावे लागेल. अन्यथा त्यांना पदावर राहता येणार नाही, असा थेट इशारा देखील राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिला. राज यांनी या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना एकप्रमारे तंबी दिली आहे. राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यानिमित्त चिपळूण मध्ये त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, त्या वेळी ते बोलत होते.
मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेल, पण तडजोड करणार नाही. असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांनी व्यक्त केलेले मत महत्त्वाचे मानले जात आहे. आगामी लोकसभा निवडणूक का लढवावी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विचारला.