फेसबुक आणि ट्विटरनंतर आता यूट्यूबनेही ट्रम्प यांच्या अकाउंटवर कारवाई केली आहे. यूट्यूबने ट्रम्प यांच्या चॅनेलवर एका आठवड्याची बंदी आणली आहे. ट्रम्प समर्थकांकडून स्टेट कॅपिटॉलवर करण्यात आलेल्या हल्ल्याला ट्रम्प यांनीच प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
तसेच ट्रम्प यांच्या काही पोस्ट या नागरिकांच्या भावना भडकावणाऱ्या असल्याचाही आरोप करत यूट्यूबने त्यांच्या काही पोस्ट काढून टाकल्या आहेत.
येत्या 20 जानेवारीला अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन हे राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर यूट्यूबने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भावना भडकावणारे व्हिडीओ यूट्यूबवरुन काढून टाकण्यात यावेत अशी मागणी अमेरिकेतल्या वेगवेगळ्या नागरी हक्क चळवळी संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. त्याला यूट्यूबने प्रतिसाद देत ट्रम्प यांचे अनेक व्हिडीओ काढून टाकले आहेत.