हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट प्रकरणातील एजंट शिवा अटकेत

0

पुणे : 2017 मध्ये दाखल गुन्ह्यात फरार असणाऱ्या आणि पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील एंजट शिवा याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरत येथून अटक केली आहे.

शिवा एजंट उर्फ शिवा रामकुमार चौधरी (37, रा. नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात 2017 मध्ये गु. र. नं. 757/2017 PITA 3,4,5 नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मोक्कानुसार कारवाई केली होती. तत्कालीन अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर वेगळी पथके तयार करुन कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत तबल 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एजंट शिवा हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता. तो नेपाळला गेल्याचे समोर आले होते. उपनिरीक्षक विजय झंजाड यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिवा एजंट हा सुरत याठिकाणी मित्राकडे आला आहे. त्यानंतर पथकाने सुरत येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे , उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, पोलीस अमंलदार प्रदीप शितोळे, प्रवीण पडवळ, बापू भोसले, विजय गुरव, संपत अवचरे, विनोद साळुंके, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, अमोल पिलाने, प्रदीप गाडे, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, मोहन येलपले, चेतन शिरोळकर, काशीनाथ परदेशी, रुपाली कर्णवर या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.