मुंबई ः अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन हे पुन्हा एक मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. आतापर्यंत या जोडीने ८ चित्रपट केलेले आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या हे दोघे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘गुलाब जामून’ या चित्रपटात दिसणार आहेत.
अभिषेक यासंदर्भात म्हणाला की, “मला नाही माहीत की या प्रोजेक्टबद्दल काय झालंय ते. मात्र, मनमर्जियामध्ये काम करताना चांगला वेळ गेला होता. मला त्या सिनेमावर गर्व आहे. मी पुन्हा अनुराग कश्यपसोबत काम करण्याची वाट बघत आहे. ऐश्वर्यासोबत काम करण्यात मला नेहमीच आनंद मिळतो. माझी ती फेवरेट को स्टार आहे. जेव्हाही मी तिच्यासोबत काम करतो तेव्हा ती मला बेस्ट काम करण्यास प्रेरित करते. मला आशा आहे की, आम्हाला दोघांनी सोबत कास्ट केलं जाईल.”
‘बाॅस बिस्वास’ या आगामी चित्रपटात अभिषेक सध्या जास्त व्यग्र आहे. यापूर्वी अभिषेक अनुरागच्या ‘लूडो’ चित्रपटात दिसला होता. ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांनी कुछ ना कहो, गुरू, सरकार राज, धूम टू, ढाई अक्षर प्रेम के, रावण, हॅप्पी एनिवर्सरी यासारख्या चित्रपटात काम केले आहे. ते दोघे पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसतील, याची उत्सुकचा त्यांच्या चाहत्यांना आहे.