अजित पवारांनी ट्विटर आणि Facebook वरुन हटवलं राष्ट्रवादीचे चिन्ह

0

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यातच अजित पवार यांच्याकडे 53 पैकी 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार असल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिल्याने चर्चांनाउधाण आलं आहे. यातच आता अजित पवारांनी पक्ष चिन्हाचा फोटो हटवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरुनराष्ट्रवादीचा लोगो हटवल्याचं समोर आलं आहे. मात्र NCP चं नाव कायम ठेवलं आहे.

अजित पवार यांनी फेसबुकवरुनही चिन्ह हटवलं आहे. फेसबुकवर फक्त अजित पवार यांचा स्वत:चा फोटो दिसत आहे. त्यांच्याप्रोफाईलचा वॉलपेपरही हटवण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह देखील हटवल्याचं दिसत आहे.

अजित पवार भाजपसोबत जाणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाआहे. एकीकडे बंद दाराआड चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे नेते सर्वकाही सुरळीत आणि चांगलं सुरु असल्याचं सांगतआहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं चाललयं तरी काय? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.