राज्यातील लॉकडाऊन बाबत अजित पवारांची माहिती

0

सातारा : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना ओमिक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून खबरदारीसाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई-पुणे पुन्हा हॉटस्पॉट होण्याची शक्यता असल्याने दोन्ही शहरांसाठी कडक नियमावली समोर येणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत या नियमावलीवर विचार करण्यात आला. यानंतर साताऱ्यातील दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अजित पवार यांनी राज्यातील काही भागात लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.

राज्यातील 10 मंत्री आणि जवळपास 20 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर आज (सोमवार) साताऱ्यात त्यांनी राज्यातील काही भागात लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली, तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागात केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लॉकडाऊन केले. देशातील अनेक राज्यात सध्या रात्रीची संचारबंदी सुरु आहे. दिल्ली, बंगळुरुत ही त्याची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. कारण, जेवताना, चहा पाण्याच्या वेळेस आपण मास्क काढतो. एकमेकांच्या समोर येतो तेव्हा कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं होतो. त्यामुळे या गोळी टाळणं नितांत गरजेचं असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.