अक्षय कुमार म्हणतो, ”म्हणून मला सासूबाईंवर गर्व आहे”

0

मुंबई ः प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारची सासू प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत चांगलीच बाॅंडिंग आहे. दोघांनी अनेक वेळा सार्वजिनक कार्यक्रमात दंगामस्ती केलेली आहे. यावेळी अक्षय कुमारने हाॅलिवूड निर्मात आणि दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांच्यासोबत डिंपल कपाडिया यांचा असलेला फोटो सोशल मीडियावर अपलोड केलेला आहे. आणि म्हंटलेलं आहे की, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

या फोटोसबोत अक्षयने क्रिस्टोफर नोलन यांनी लिहिलेली नोटदेखील शेअर केलेली आहे. त्यात डिंपल यांचे कौतुक केलेले आहे. ‘टेनेट’ नावाची फिल्म शुक्रवारी रिलीज करण्यात आली आहे. या चित्रपटातून डिंपल यांनी हाॅलिवूडमध्ये पदार्पण केलेले आहे. या चित्रपटात डिंपलचे नाव प्रिया सिंह आहे, तर त्या हत्यांरांची तस्करी करण्याची भूमिका आहे.

क्रिस्टोफर नोलनने नोटमध्ये म्हटलेलं आहे की, ”डिंपल, मी काय बोलणार. तुमच्यासोबत काम करणं ही आनंदाची गोष्ट आहे. प्रिया सिंहच्या पात्रा जगभरात जीवंत करताना पाहून भारावून गेलो. तुमचे अभिनयाचे कौशल्य, कष्ट आणि तुमची प्रतिभा पाहून मी धन्यवाद करतो. या चित्रपटात डिंपलसोबत डेविड वाॅशिंग्टन, राॅबर्ट पॅटिंसन, एलिजाबेथ डेबिकी, केनेथ ब्राघन, आरोन टेलर जाॅनसन, मायकल केन आणि हिमेश पटेल हेदेखील दिग्गज कलाकार आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.