मुंबई : राज्य सरकारच्या खातेवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला वित्त व नियोजन तथा कृषीसह सर्वच महत्त्वाची खाती आली आहे. त्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला दुय्यम खाती मिळाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार) अनिल देशमुख यांनी शिंदेंवर तिखट हल्ला चढवला आहे.
खातेवाटपात सर्वात महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते अनुभवी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना डावलून त्यांना महत्त्वाची खाती देण्यात आल्याचे दिसते, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील इच्छुकांच्या वाट्याला येऊ शकतील अशी महत्वाची खातीही आता शिल्लक राहिली नाहीत, असेही देशमुख यावेळी म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे सरकारमध्ये जलसंपदा, पाणीपुरवठा, महसूल, गृह, कृषी, सहकार, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, आरोग्य आदी खाती महत्त्वाची मानली जातात. यातील बहुतांश खाती राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपला मिळाली आहेत. यापैकी वित्त व नियोजन, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, कृषी, महिला व बालकल्याण, मदत व पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य, क्रीडा व युवक कल्याण ही खाती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील मंत्र्यांना मिळाली आहेत.