भरदिवसा तरुणावर धारदार हत्याराने वार

0

पिंपरी : भर दुपारी तीनच्या सुमारास एका तरुणावर पाच जणांनी कोयता आणि तलवारीने तरुणावर सपासप वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात घडली.

यामध्ये सुरज नितीन टेकवडे (28, रा. तळेगाव दाभाडे) हा जखमी झाला आहे. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर मंगेश हिरे आणि त्याचे चार साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेकवडे तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात चहाचा व्यवसाय करतात.

मंगळवारी दुपारी तीन वाजता आरोपी टेकवडे यांच्या चहाच्या दुकानात आले. आरोपी मंगेश आणि फिर्यादी टेकवडे यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाच्या रागातून आरोपींनी कोयता आणि तलवारीने टेकवडे यांच्यावर सपासप वार केले. त्यात टेकवडे यांच्या मानेवर, हातावर, पायावर, पाठीवर गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.