मुंबई : कोरोना विषाणूच्या दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने लावण्यात आलेले कठोर निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत सर्व सेवा, सुविधा सुरू होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांत काही निर्बंध लागू असणार आहेत.
पहिल्या टप्प्यात एकूण 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे
दुसर्या टप्प्यात 5 जिल्हे
तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्हे
चौथ्या टप्प्यात 2 जिल्ह्यांचा समावेश
पहिला टप्पा – ५ टक्के पॉझिटीवेहीटी रेट आणि ऑक्सिजन २५ टक्के बेड आत आहे तिथ लांकडाऊन राहणार नाही. मॉल्स हॉटेल्स दुकाणे वेळेचे बंधन नाही.
पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्ण सुरू होतील, चित्रपट गृह सुरू होतील.
जिम, सलून सुरू राहणार, बस 100 टक्के क्षमतेने धावणार, आंतरजिल्हा प्रवास करण्यास मुभा मिळणार आहे.
अनलॉक झालेले राज्यातील 18 जिल्हे
भंडारा, बुलढाणा, चंदपूर, धुळे, गडचिरौली, गोंदिया, वर्धा, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वाशीम, यवतमाळ.
दुसरा टप्पा – दुसऱ्या टप्प्यात एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील या जिल्ह्यांत काही निर्बंध अंशत: शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
तिसरा टप्पा – तिसऱ्या टप्प्यात एकूण 10 जिल्ह्यांचा समावेश आहे.