उद्धव ठाकरेंना भाजपचा आणखी एक धक्का

0

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. मात्र एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’ वर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आता चार दिवस उरले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या खासदारांच्या गटाने दबाव निर्माण केला होता. खासदारांनी उघडपणे एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय जाहिर केला होता. त्यामुळे आभार व्यक्त करण्यासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या मातोश्रीवर जाणार असल्याची चर्चा होती.

पण, एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या मुंबईत दाखल झाल्या असून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
शिवसेनेने पाठिंबा जाहीर केल्यानंतर मुर्मू मातोश्रीवर जाणार अशी चर्चा सुरु होती.
मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विशेष म्हणजे, एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज दुपारी शिंदे गटाला भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.