सोलापूर : संपूर्ण राज्यात शेअर मार्केटच्या माध्यमातून अनेकांना करोडोचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये
बार्शी शहरातील लोकांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडण्याला आरोप असलेला मुख्य आरोपी विशाल फटे हा अखेर पोलिसांसमोर हजर झाला आहे. पोलिसांनी विशाल फटेला अटक केली. तर गुंतवणूक घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत १८ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अलका शेअर्स सर्व्हिसेसचा संचालक विशाल फटेच्या कारनाम्याची राज्यभरात खळबळ उडाली आहे.
विशाल फटे आणि त्याच्या सहका-यांनी एकूण ५० जणांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत १८ कोटींना फसवणूक केल्याचे समोर आले आहे. १० लाख गुंतवणुकीवर कोट्यवधीचे आमिष विशाल फटेने दिले होते. अखेर आज आरोपी स्वत: सोलापूर पोलिस अधीक्षक कार्यालयात झाला हजर झाला आहे. पोलिसांनी विशाल फटेला अटक केली. याआधीच गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून आरोपी विशाल अंबादास फटे, राधिका विशाल फटे, रामदास गणपती फटे, वैभव अंबादास फटे आणि अलका अंबादास फटे यांच्या विरोधात भा.द.वि.कलम ४२०, ४०९, ४१७, ३४ आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज सकाळीच आरोपी विशाल फटे याने आज आपली बाजू स्पष्ट केली होती. युट्यूबद्वारे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. माझा लोकांना फसवण्याचा कोणताही हेतू नव्हता, काही चुका झाल्या. त्यामुळे पैसे माझे अडकले आहेत. मला माझ्या चुका मान्य असून मी शिक्षा भोगायाला तयार आहे. त्याचबरोबर आज मी जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये हजर होणार असल्याचेही त्याने आपल्या व्हिडीओत स्पष्ट केले होते. कालच त्याच्या वडील आणि भावाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज विशाल फटे याने व्हिडीओ पोस्ट करुन आपली बाजू स्पष्ट केली.