लाच लुचपत प्रतिबंध पथक दिसताच अधिकाऱ्याने चक्क नोटाच गिळल्या

0

हरयाणा : हरयाणामधील फरिदाबाद येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. लाच घेणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याने चक्क लाचेत घेतलेल्या नोट गिळायचा प्रयत्न केला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याला रोखले व त्याच्या तोंडात हात घालून नोटा बाहेर काढल्या.

शुभनाथ नावाच्या एका व्यक्तीती म्हैस चोरीला गेली होती. त्या प्रकरणात तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलीस अधिकारी महेंद्र सुनोराने सहा हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे शुभनाथने विजिलंस विभागाकडे दाद मागितली होती. महेंद्र यांना रंगेहाथ पकडण्यासाठी विजिलंस विभागाने सापळा रचला. एक विशिष्ट केमिकल लावलेले पैसे त्यांनी शुभनाथला दिले व तेच पैसे महेंद्रला देण्यास सांगितले.

शुभनाथ ज्यावेळी महेंद्रला पैसे द्यायला गेला त्यावेळी विजिलंस अधिकारी आजूबाजूलाच लपलेले होते. महेंद्रने पैसे घेताच अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. अधिकाऱ्यांना पाहताच महेंद्रने ते पैसे तोंडात कोंबले व गिळायचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी तोंडात हात घालून ते पैसे ताब्यात घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.