नवी दिल्ली : आशिया चषकाची सुरुवात शनिवारी श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याने झाली. परंतु बहुतांश क्रिकेट चाहत्यांसाठी स्पर्धेची खरी सुरुवात आज होणार आहे. कारण, आज एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत-पाकमध्ये सामना होणार आहे.
या स्पर्धेत दोन्ही संघ अनेकदा एकमेकांपुढे येणार असले तरी आजच्या पहिल्याच सामन्यामुळे प्रेक्षकांचा रोमांच शिगेला पोहोचणार आहे. तब्बल 10 महिन्यांनंतर दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमनेसामने येत आहेत. यापूर्वी 24 ऑक्टोबर 2021 रोजी दोन्ही संघांत टी-20 विश्वचषकात शेवटचा सामना झाला होता.
या आशिया चषक स्पर्धेमध्ये दोन्ही संघांकडून कोणत्या 11-11 खेळाडूंना संधी मिळू शकते ते जाणून घेऊया. यासोबतच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या खेळाडूंचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे हे देखील तुम्हाला कळेल. फलंदाजीच्या क्रमानुसार आम्ही दोन्ही संघांचे प्लेइंग 11 समोरासमोर ठेवले आहेत.