आमदार भास्कर जाधवांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न ?

अंगणात दगड, पेट्रोलच्या बॉटल्स सापडल्या

0

चिपळूण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आलीये. भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न कुणी आणि का केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

उद्धव ठाकरेंच्या गटात असलेले आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील घराच्या दिशेनं भिरकावण्यात आलेल्या वस्तू सापडल्या आहेत.

भास्कर जाधव यांच्या घराच्या अंगणात दगड, क्रिकेटचे स्टम्प, पेट्रोल भरलेल्या बॉटल्स सापडल्या आहेत. भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर चिपळूणमध्ये याची जोरदार चर्चा सुरू झालीये.

भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न कुणी केला आणि कशासाठी केला, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अज्ञातांकडून आमदाराच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडालीये.

भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देणार असल्याची माहिती भास्कर जाधव यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी एका वृत्तवहिनीला दिली.

भास्कर जाधव यांचं कुडाळ येथील भाषण चर्चेत असतानाच ही घटना घडलीये. आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध एसीबीची कारवाई सुरू असून, त्याच्या निषेधार्थ कुडाळ येथे मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चात भास्कर जाधवांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणेंवर टीका केली होती. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून तक्रारही दाखल करण्यात आलीये.

Leave A Reply

Your email address will not be published.