लातूर पॅटर्न मुळे राज्यात वेगळी शैक्षणिक ओळख मिळवलेल्या लातूर मध्ये सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद होती, जिल्ह्यातील सर्व वस्तीगृहे सुद्धा बंद होती. हळूहळू सर्व सुरू होत असताना आता पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. एमआयडीसी मधील वस्तीगृहातील आज 41 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले. आजपर्यंत या वसतीगृहातील तब्बल 152 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आज कोरोनाबाधित आढळून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दैनिक सामनाला दिली.