औरंगाबाद: शहराला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजनहरिभाऊ शिंदे यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.
मुकुंदवाडी पोलिसात डॉ. राजन शिंदे यांच्या पत्नी डॉ.मनीषा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सिडको येथील संत तुकोबा नगरात डॉ. राजन शिंदे, मुलगी चैताली (20), मुलगा रोहित (17), सासरे हरिभाऊ आणि सासू चंद्रकला हे राहतात. रविवारी संध्याकाळी साडे नऊवाजता घरातील सासू–सासरे, जेवण करून त्यांच्या खोलीत झोपी गेले.
मुलगी, मुलगा जागेच होते. राजन हे मित्राला भेटण्यासाठी बाहेर गेले होते. रात्री साडे अकरा वाजता ते बाहेरून जेवण करून घरी आले. त्यानंतर पती–पत्नींनी रात्री एक वाजेपर्यंत टीव्ही पाहिला. मनीषा रात्री एक वाजता खोलीत झोपण्यासाठी गेल्या. मुलांनाही झोपायलासांगितले. पती राजन हे हॉलमध्ये टाकलेल्या अंथरुणावर पडून टीव्ही पाहत होते. पण मनीषा सकाळी सव्वा सहा वाजता उठून हॉलमध्येआल्या, तेव्हा त्यांना डॉ. राजन हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या शेजारी मुलगा आणि मुलगी दोघेही नव्हते.
डॉ. राजन यांच्या मुलाने सकाळीच पोलिसांना या खूनाची माहिती दिली. त्याबरोबर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीकेलेल्या तपासानुसार राजन शिंदे यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर केलेले वार एवढे भयंकर होते की, एवढी क्रूरता कुणी केली असावी असा प्रश्न पडतो. पोलिसांच्या अंदाजानुसार..
राजन शिंदे यांच्या दोन्ही हातांच्या मनगटाजवळील नसा कापल्या असाव्यात, त्याचे खोलवर घावही दिसत आहेत. कपाळासह कानहीचिरण्यात आला आहे. एका घावात न चिरल्यामुळे कानावर अनेक घाव केल्याचे दिसत आहे. डोक्यात हातोड्याचे वार केलेले दिसतआहेत. दोन्ही हातांवर मारेकऱ्याने दोन्ही पाय ठेवून गळा चिरला असवा. डॉ. राजन शिंदे यांच्या छातीवर मारेकरी बसल्याच्या खुणाहीआढळल्या आहेत. डॉ. राजन शिंदे यांचा खून नेमका कुणी केला, याचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही. पण ही हत्या कुणीतरीनिकटवर्तीयांनीच केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजन शिंदे यांचा मुलगा अलार्म लावून सकाळी साडे पाच वाजता उठला. त्याला हॉलमध्ये वडीलरक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. वडिलांना घेऊन जाण्यासाठी चार चाकी गाडी घराच्या पार्किंगमधून काढून मुलगा अँब्युलन्स घेऊनयेण्यासाठी एका खासगी रुग्णालयात गेला. रस्त्यात एका दुचाकीला धडक दिल्याने गाडी तेथेच सोडून तो जवळच्या खासगीरुग्णालयातील अँब्युलन्स घेऊन घरी आला. मात्र अँब्युलन्सचालकाने ही पोलीस केस असल्यामुळे सेवा देण्यास नकार दिला. अँब्युलन्सगेल्यानंतर मुलाने बहिणीला झोपेतून उठवले, मात्र तोपर्यंत आईला कल्पनाही दिली नाही.
मुलगा आणि मुलगी दोघेही चिश्तीया पोलीस चौकीत गेले. तेथूनच 100 नंबरवर सकाळी 6 वाजता पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोघेही घरी परतले, तोपर्यंत आई उठलेली होती. काही वेळातच ही घटना वाऱ्यासारखी शहरभर पसरली. डॉ. शिंदे यांच्या घराचेसर्व दरवाजे आतून बंद होते. घरात त्यांच्यासह पत्नी, दोन मुले आणि आई–वडील होते. घरातील वस्तू चोरीला गेलेली नाही. दरवाजेहीतोडण्यात आलेले नाहीत.
डॉ. शिंदे रक्ताच्या थारोळ्या पडल्यानंतर तत्काळ पोलिसांना बोलावले नाही. पोलीस येण्यापूर्वीच हॉलमध्ये सांडलेले रक्त पुसून घेण्यातआले. बाहेरून कोणी आल्याच्या पावलांचे ठसेही आढळले नाहीत.
हॉल ते खोलीपर्यंतच एकाच्या तळपायाचे ठसे पाहणीत आढळले. त्यामुळे हा गृह कलहातून घडलेला प्रकार असावा, असा प्राथमिकअंदाज लावला जात आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नसून लवकरच पोलिसांकडून गुन्ह्याचा उलगडा होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली.