पोलिसांकडून लाठीचार्ज; शाहूनगर मध्ये तणावाचे वातावरण

0

पिंपरी : शाहूनगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान उदघाटन प्रसंगी सत्ताधारी भाजप विरोधात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. जोरदार घोषणाबाजी सुरु झाली असून या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान ‘चोर हे चोर हे, बीजेपी चोर हे’ आदी घोषणा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाहूनगर परिसरात महापालिकेने 14 कोटी खर्च करुन भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान तयार केले आहे. या उद्यानामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे. आज संध्याकाळी या उद्यानाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

या उदघाटन सोहळ्यास काही वेळ शिल्लक असतांना या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या ठिकाणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक मयूर कलाटे, राजू मिसाळ, मंगला कदम यांच्यासह अन्य आजी-माजी नगसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.