वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!

सामनातून बंडखोरांना दिला इशारा

0

मुंबई : राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीनंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. शिवसेनेत उभी फुट पडली आसून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. राज्यातील या घडामोडींनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पद सोडण्याचे संकेत दिले आहेत.दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून बंडखोर आमदारांना वेळीच शहाणे व्हा असा इशारा देण्यात आला आहे.

अग्रलेखात काय म्हंटले आहे

राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीतील ‘जादा’ विजय कोणामुळे झाला हे आता उघड झाले आहे. आता तर आमदारांना डांबून ठेवले गेले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले गेले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी सांगितले आहे.
शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचविले आहेत, अशा संकटांना छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली आहे. सत्ता असली काय आणि गेली काय शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे माजी होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!
अशा शब्दात खोचक टोमणे मारत बंडखोरांना इशारा दिला आहे.

लोकांनी आमदार – नामदार होता आले. हे सर्व आमदार पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले तर जनता त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. याचे भान या मंडळींना नसेलच असे नाही. त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार पुन्हा स्वगृही परत येतील. प्रवाहात सामील होतील. आज जे भाजपवाले त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहेत ते गरज संपताच पुन्हा फेकून देतील. भाजपची परंपरा तर हीच आहे. त्यामुळे कोणी कितीही जोरबैठका मारत असले तरी वादळ सरेल व आकाश स्वच्छ होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.