राज्यातील कुस्ती खेळाडूंसाठी मोठी बातमी; क्रीडा विभागाने घेतला ‘हा’ निर्णय

0

मुंबई : राज्यातील कुस्ती खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पिक सारख्या विविध स्पर्धा आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पदकांची संख्या वाढविण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

कुस्ती या खेळासंबंधी तंत्रज्ञान आदान-प्रदान करण्याबाबत जपानमधील वाकायामा स्टेट व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थान सेवासदन येथे आज जपानच्या वाकायामा स्टेटच्या शिष्टमंडळासोबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. यावेळी जपानच्या वाकायामा स्टेटचे इंटरनॅशनल अफेअर्स डिव्हिजनचे उपसंचालक यामाशिता हे त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते. राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे विविध उपक्रम, मिळविण्यात आलेल्या पदाकांविषयी मंत्री महाजन यांनी वाकायामा स्टेट यांना माहिती दिली.

तसेच कुस्ती या खेळासंबंधी तंत्रज्ञान आदान-प्रदान करण्याबरोबरच खेळाडूंना प्रशिक्षण देण्याविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सामंजस्य करार लवकरात लवकर होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत मंत्री महाजन यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.