राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपा आमदाराला मोठी ‘ऑफर’

0
सातारा : साताऱ्यात भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात वाद ताजा आहे. यातच शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना पक्षात येण्याची ऑफर देत शशिकांत शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, सातारा नागपालिका निवडणुकीपूर्वी शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादीत आले तर तेच पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनेलचे नेतृत्व करतील. उरला प्रश्न तो जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा. इथे कधीही राजकारण येऊ दिले नाही. त्यामुळे रामराजे नाईक निबाळकर यांच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करतील असं त्यांनी सांगितले. मात्र, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र ज्या ठिकाणी विरोध होईल, तिथे ताकदीने निवडणूक लढली जाईल असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला.

पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या मी सुरुवातीपासून पार पडत आलो आहे. जावळी, कोरेगाव हे दोन्ही तालुके माझ्यासाठी जवळचे आहेत. या तालुक्यात जर कोणी एकत्र येऊन पक्षवाढीसाठी काम करत असेल तर मला देखील पक्षवाढीसाठी आणि पक्षाला फायदा होण्यासाठी प्रयत्न करायला नकोत काय? असा सवाल करत याचा जर कोणाला त्रास होत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. असेही शिंदे म्हणाले.

शिंदे म्हणाले, पक्षने मला मोठी जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु आहे. पक्षाची ताकद टिकवून ठेवायची असेल तर मला काम करावं लागेलच. त्याचा जर कोणाला त्रास होत असेल तर त्याला मी काही करू शकणार नाही. शिवेंद्रसिंहराजेच काय माझा कुठल्याही नेत्याशी वैयक्तिक वाद नाही. पण पक्षाने दिलेली जबाबदारी पार पडायची आहे.

कोणाला वाईट वाटते म्हणून पंचायत समिती, जिल्हा परिषद सोडायची का? काही दिवसांनी विधानपरिषद, डीपीडीसीची निवडणूक लागेल, राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या तरच या निवडणुकांमध्ये फायदा होणार असल्याचे सांगत जिल्हा बँकेला जावळी सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.