मुंबई : राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचे दिसत आहे. राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या उमेदवारीवरुन चर्चा होताना दिसत आहे. नुकतंच भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारीसाठी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर पंकजा यांना विधान परिषद उमेदवारीवरुन डावलण्यात आलं आहे.
भाजपने ज्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांना विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या यादीमध्ये सदाभाऊ खोत, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. मात्र, पंकजा मुंडे यांना डावलून उमा खापरे यांच्या नावाचा समावेश करुन भाजपने सर्वांनाच एक झटका दिला आहे.
विधान परिषदेसाठी भाजपची यादी –
– प्रवीण दरेकर
– प्रसाद लाड
– श्रीकांत भारतीय
– राम शिंदे
– उमा खापरे