भाजपा सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष ः सावंत
संसदेच्या हिवाळी अधिवेशन रद्द केल्यामुळे राज्यातील भाजपा नेत्यांची गोची
मुंबई ः ”राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी आहे, अशी बोंब ठोकत महाविकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणाणारा भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे, मोदी सरकारने कोविडमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्दच केले, आता मोदींना कितीवे आश्चर्य म्हणणार?”, असा मार्मिक प्रश्न काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.
ठाकरे सरकाने राज्य विधीमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन बोलाविले म्हणून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर प्रचंड टीका केली होती. राज्य सरकार प्रश्नांपासून पळ काढतेय, सरकारला करोनाने कानात सांगितलंय का, राज्याच्या विविध प्रश्नांवर सरकार चर्चा करायला तयार नाही, ही महाविकास आघाडीचे सरकार हे आठवे आश्चर्यच आहे, अशी विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर केली होती.
मात्र, केंद्राने करोना महामारीच्या काळात संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यासाठी सर्व पक्षांनी अनुकूलता दाखविली आहे. आता सरळ जानेवारी महिन्यात अर्थन संकल्पीय अधिवेशन होईल, असे संसदीय कामदाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काॅंग्रेसचे नेते अधीररंज चौधरी यांना पाठविलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे, या पत्रावरून राज्यातील भाजपाचे नेतेच तोंडावर आपटले आहेत.