तेलंगणा : भाजप पैसे देऊन आमदार विकत घेत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत असतं. आता तेलंगाणात तेलंगाणा राष्ट्र समितीच्या आमदारांना लाच देताना भाजप नेत्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तेलंगाणाचे सत्ताधारी पक्ष तेंलगाणा राष्ट्र समितीचे आमदार पायलट रोहित रेड्डी, बीरम हर्षवर्धन रेड्डी, रेगा कंथाराव आणि गुववाला बलराज यांना भाजपच्या काही नेत्यांनी पैसे देऊन भाजपमध्ये येण्याचे लालूच दाखवले होते. तेव्हा आमदारांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती आणि अशा प्रकारे पद आणि पैश्यांचे लालूच दाखवले जात आहे असे पोलिसांनी सांगितले. तेव्हा पोलिसांनी सापळा रचला आणि भाजपच्या चार नेत्यांना अटक केली आहे. तेलंगाणातील एका फार्म हाऊसमध्ये ही डील होणार होती. तेव्हा पोलिसांनी इथे छापा मारला आणि भाजपच्या चार नेत्यांना अटक केली. या नेत्यांकडून 100 कोटी रुपयांहून अधिक रक्कम आणि काही चेक्स जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपींमध्ये सतीश शर्मा, डी सिम्हायाजी, रोहित रेड्डी आणि नंदकुमार यांचा समावेश आहे. यापैकी सतीश शर्मा हा हरियाणामध्ये एका मंदिरात पुजारी आहे. डी. सिम्हायाजी हा तिरुपती मंदिराच्या श्रीमनाथ राजा पीठममध्ये पीठादिपती आहे. रोहित रेड्डी हा स्वामींचा भक्त असून नंदुकार हा हैदराबादचाच रहिवासी आहे.