‘हायव्होल्टेज’ चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय

0

पिंपरी : हायव्होल्टेज बनलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीच्या निकाल समोर आला आहे. सकाळी आठ वाजतामनमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरी पासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगतापयांनी आघाडी घेतली होती. 37 व्या फेरीनंतर जगताप यांनी राष्ट्रवादीचे नाना उर्फ विठ्ठल काटे यांचा 36 हजार 770 मताने पराभव केला.

हि निवडणूक प्रत्येकाने प्रतिष्ठेची केली होती. केंद्रीय मंत्री, राज्य सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेकजण रींगणात उतरले होतेमहाविकास आघाडीकडून शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, नाना पटोले, भास्कर जाधव आदीस्टार प्रचारक उतरले होते. राष्ट्रवादीचे, महाविकास आघाडीचे नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी कडवी झुंज दिली आहे.

36 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 135494 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 99424 मते मिळालेलीआहेत. अपक्ष उमदेवार राहुल कलाटे यांना 43075 मते मिळाली आहेत. जगताप यांना 36070 मतांची आघाडी मिळाली आहे.

 

एकूणच 37 फेऱ्यामध्ये अश्विनी जगताप यांनी 36770 मतांची आघाडी मिळवत महाविकास आघाडीचे नाना उर्फ विठ्ठल काटे यांचा पराभव केला.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.