भाजपचा संविधान बदलण्याचा डाव : जयंत पाटील
संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका
शिरूर : भाजपच्या अनेक खासदारांनी संविधान बदलण्याची त्यांची भूमिका जाहीरपणे मांडली आहे. त्यांच्या भूमिकेला वाढत्याविरोधामुळे आणि लोकसभेत पराभवाच्या भितीमुळे भाजपचे नेते आम्ही तसं काही करणार नाही असं म्हणत असले तरी, आपण त्यांच्याभूलथापांना बळी न पडता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान टिकविण्यासाठी आघाडीच्या उमेदवाराच्याच पाठीशी उभे रहाअसं आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. ते शिरूर येथे आयोजित केलेल्याप्रचार सभेत बोलत होते.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे शिवणसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष भाजपाने फोडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्लाकेला आहे, ही गोष्ट महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला अजिबात पटलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता महाविकासआघाडीच्या बाजूनेच कौल देणार आणि या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात ४८ जागांपैकी ३२ ते ३५जागा निवडून येणार; हे आता स्पष्ट झालं आहे; असंही जयंत पाटील म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची फक्त भूमिकाच न करता दिल्लीमध्ये ताठ मानेने भाजपा सरकारलाप्रश्न विचारण्याची हिंमत ठेवणाऱ्या शरद पवार यांच्यासोबत कुठल्याही परिस्थितीत राहून डॉ. अमोल कोल्हे यानी जो करारीपणादाखवला; तोच शिवशंभूंचा विचार अमोल कोल्हे याना पुन्हा एकदा खासदार बनवणार असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी यावेळीव्यक्त केला.
अशोक पवारांचा कारखाना बंद पाडण्याचं काम कोणी केलं?
अशोक पवारांच्या ताब्यात असणारा घोडगंगा सहकारी साखर कारखाना, बंद पाडण्यासाठी कोणी प्रयत्न केले हे सर्वांना माहिती असून; कारखाना बंद पाडून नेत्यांवर अंकुश ठेवू पाहणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितपवारांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.